अदिवासी भागातील सरकारी अरोग्य उपकेंद्र, तळेघर राञी 7 नंतर जातंय झोपि
अदिवासी भागातील सरकारी अरोग्य उपकेंद्र, तळेघर राञी 7 नंतर जातंय झोपि
महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, आंबेगाव : अदिवासी भागात तळेघर येथे भीमाशंकर रोडवर आरोग्य विभाचे उपकेंद्र असून त्या ठिकाणी राञी पुर्ण पणे बंद असते.त्या उपकेंद्रात उपचारासाठी पुर्ण भीमाशंकर परिसरातील वाड्या वस्तीतील लोक जिव वाचविण्यासाठी जिव मुठीत घेऊन उपकेंद्रात धाव घेतात, पण उपकेंद्राला बाहेरून टाळा मारलेला आसतो, आणी तिथेच पेशट आणी त्याची नातेवाईक हतबल होतात.पेशंटचा जिव वाचावा म्हणुन त्यांना 30 किलोमिटर अंतरावर घोडेगाव कींवा मंचर येथे पेशंट आणावं लागतं, त्यात पेशंटची प्रकृतीी ठिक असेल तर तो घोडेगाव कींवा मंचर येथे आल्यावर उपचार घेऊन बरा होतो, पण काही पेशंट रस्त्यात येता येता जिव सोडतात याला कारणीभूत कोन ? अस प्रश्न आदिवासी गरीब जनतेने सरकारला केला आहे, की आदिवासी पट्ट्यातील लोकांची समजुत काढण्यासाठी ही फक्त ईमारत बांधली आहे की काय असाही, सवाल तेथील जनतेनी केलाय.
आदिवासी विभागातील जनतेच्या मनाशी खेळ खेळणे बंद करून, ताबडतोब नियमानुसार उपकेंद्र चालवावे, या उपकेंद्राचे खासगी हॉस्पिटल चालवण्याचे पूर्णपणे षडयंत्र आहे. या विभागातील जनतेचा जलद गतीने ईलाज व्हावा म्हणून हे उपकेंद्र देण्यात आले, परंतु असा प्रकार जर इथे होत असेल तर उपकेंद्राचे फायदा तरी काय ? तळेघर उपकेंद्र 24 तास चालु असलं पाहिजे आणी तिथे उपचार पन दिले पाहिजे नाहीतर उपकेंद्राला नक्कीच कायमचा टाळा ठोकुु, चंद्रकांत भवारी
Post Comment
कोणत्याही टिप्पण्या नाहीत